बटाटा व तळण हानीकारक नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बटाटा व तळण हानीकारक नाही
बटाटा व तळण हानीकारक नाही

बटाटा व तळण हानीकारक नाही

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः बटाट्याचे पदार्थ आणि तळकट पदार्थ हे आपल्या प्रकृतीची हानी करतात असे काही नाही. फक्त त्याच तेलात वारंवार पदार्थ तळल्यास ते तब्येतीला हानिकारक असते, तसेच बटाटा पराठ्यासारखे जास्त कॅलरी देणारे पदार्थ खाल्ले की आपल्या अंगात जास्त कॅलरी जमा होतात, असे विख्यात शेफ अजय चोप्रा यांनी येथे सांगितले.

गोदरेज टायसन फुड्सतर्फे आयोजित सुरक्षित व चवदार, आरोग्यदायी खाद्यपदार्थ यासंदर्भातील परिसंवादात ते बोलत होते. पाकीटबंद खाद्य पदार्थांत मोठ्या प्रमाणावर प्रिझर्वेटिव्ह असतात, गोठवलेले पदार्थ शिळे असतात आदी गोष्टी या गैरसमज असल्याचेही यावेळी तज्ज्ञांनी सांगितले. या परिसंवादात गोदरेज टायसन फूडचे सीईओ अभय पारनेरकर, फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑफ इंडियाच्या विभागीय संचालक प्रीती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

हल्ली आयक्यूएफ तंत्रानुसार शीतगृहात पदार्थ तात्काळ गोठवला जातो व त्यामुळे त्यात अजिबात जंतूंची वाढ होत नाही, मात्र हे लोकांना माहिती नसते. बाजारातील मटार हे किमान पंधरा दिवसांपूर्वी शेतातून अर्धे कच्चे काढलेले असतात व प्रवासात ते हळूहळू पिकत जातात. मात्र आयक्यूएफ तंत्राच्या डीप फ्रिजरमध्ये ठेवलेले पदार्थ जेमतेम काही तासांपूर्वी शेतातून काढलेले असतात, त्यामुळे ते तसेच्या तसे तसे राहतात. त्यामुळे आम्हाला आमच्या पाकीटबंद खाद्य पदार्थांमध्ये फारसे प्रिझर्व्हेटीव्ह टाकावे लागत नाहीत, असे पारनेरकर म्हणाले.

आरोग्यदायी पदार्थ चविष्ट नसतात असे काही नाही आणि चविष्ट पदार्थ खाणे हे पाप नाही. त्याने आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही, फक्त ते अस्वच्छ प्रकारे बनवले नसावेत. चविष्ट आरोग्यदायी व स्वच्छ अशा डिश पुष्कळ आहेत, असेही अजय चोप्रा म्हणाले; तर अन्नपदार्थ स्वच्छ आरोग्यदायी असावेत, त्यांचा दर्जा चांगला असावा यासाठी प्रशासन, ग्राहक आणि खाद्यान्न उद्योग या सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. चविष्ट पदार्थांमार्फतच आरोग्य सांभाळले जाईल, याची काळजी सर्वांनीच घ्यावी, असे प्रीती चौधरी म्हणाल्या.

आयक्यूएफ तंत्रामुळे जंतू वाढत नाहीत
------------------------------
शीतगृहात ठेवलेले समीष पदार्थ खाण्याची लोकांची तयारी नसते, समीष पदार्थ त्यांना ताजेच हवे असतात. मात्र आयक्यूएफ तंत्राच्या डीप फ्रीजमध्ये जंतू वाढत नाहीत, हेच लोकांना माहिती नसते. आठवड्यातून एकदा समोसे वगैरे तेलकट पदार्थ खाणे ठीक आहे, असेही अजय चोप्रा म्हणाले.