सहकारी साखर कारखान्यांना कामगिरीनुसार व्याजदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकारी साखर कारखान्यांना कामगिरीनुसार व्याजदर
सहकारी साखर कारखान्यांना कामगिरीनुसार व्याजदर

सहकारी साखर कारखान्यांना कामगिरीनुसार व्याजदर

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ ः सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक शिस्त लागावी, यासाठी त्यांच्या आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन करून त्यानुसार त्यांना कर्जाच्या सवलतीचा व्याजदर आकारण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य सहकारी शिखर बँकेने घेतला आहे.
आर्थिक शिस्त, व्यवसायाची पद्धत, प्रशासन, आर्थिक बाबी आणि व्यवसायातील प्रगती या पाच गटांतील कारखान्यांच्या कामगिरीचे वर्गीकरण करून त्यांना अ, ब, क, ड या चार वर्गामध्ये टाकण्यात येईल. या रेटिंग मॉडेलनुसार, ८०च्या वर गुण मिळालेल्या कारखान्यांना अ वर्ग, ६५ ते ८० गुण मिळालेल्या कारखान्यांना ब वर्ग, ५० ते ६५ गुण मिळालेल्या कारखान्यांना क वर्ग व ५० च्या खाली गुण मिळालेल्या कारखान्यांना ड वर्ग दिला जाईल, अशी माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या सहकार्याने हे धोरण ठरवण्यात आले आहे. ज्या कारखान्यांना पात्रता गुण मिळणार नाहीत त्यांना ही सवलत मिळणार नाही. रेटिंग पद्धतीनुसार निश्चित झालेला व्याजदर एक वर्षासाठी लागू राहील. पुन्हा ३१ मार्चच्या आर्थिक स्थितीवर पुढील आर्थिक वर्षाकरिता रेटिंग निश्चित केले जाईल.

ताळेबंदीनंतर ठरवणार रेटिंग
------------------------
कारखान्याचा कर्ज प्रस्ताव मिळाल्यावर कारखान्याच्या ऑडिटेड ताळेबंदावरून त्याचे रेटिंग ठरवण्यात येईल. त्या वर्गवारीनुसार कमीत कमी नऊ टक्के व जास्तीत जास्त साडेअकरा टक्के इतका व्याजदर त्यांना दिलेल्या कर्ज सवलतीवर आकारण्यात येईल. दरवर्षी ३१ मार्चच्या आर्थिक निकषांवर हे रेटिंग होईल. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून या रेटिंग मॉडेलची अंमलबजावणी करण्यात येईल.