सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर
सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर

सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेला निलंबित पोलिस निरीक्षक सचिन वाझेला विशेष पीएमएलए न्यायालयाने शुक्रवारी (ता. १८) सशर्त जामीन मंजूर केला. मात्र अन्य प्रकरणात अटकेत असल्यामुळे वाझे तूर्तास कारागृहाबाहेर येऊ शकणार नाही.
वाझेविरोधात सध्या एंटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरण प्रलंबित आहे. विशेष न्या. राहुल रोकडे यांनी वाझेला जामीन मंजूर केला. वाझेचा हा दुसरा जामीन अर्ज होता. ईडीने या प्रकरणात वाझेविरोधात गुन्हा दाखल केलेला असला तरी प्रत्यक्षात त्याला या प्रकरणात कधी अटक केली नाही. या प्रकरणात अटक न केल्यामुळे जामीन अमान्य करण्याच्या तरतुदी मला लागू होऊ शकत नाहीत, असा युक्तिवाद वाझेच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. तसेच देशमुख यांना या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे, असेही युक्तिवाद करताना त्याच्या वतीने सांगण्यात आले. त्याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनायचे आहे, असा अर्ज त्याने जूनमध्ये केला आहे. अद्याप यावर सुनावणी प्रलंबित आहे, तर सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात वाझे माफीचा साक्षीदार आहे. अन्य दोन्ही प्रकरणांत तो अटकेत आहे. देशमुख यांनी पदाचा गैरवापर करून नागपूरमधील स्वतःच्या श्री साई शिक्षण संस्थेत निधी वळविला, असा आरोप ईडीने केला आहे.