वरळीत पाच मुले बुडाली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरळीत पाच मुले बुडाली
वरळीत पाच मुले बुडाली

वरळीत पाच मुले बुडाली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : वरळीतील कोळीवाड्याजवळील समुद्रात पाच मुले बुडाल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) घडली. ही घटना दुपारी ३.४० च्या दरम्यान घडली. यातील दोन मुलांचा मृत्यू झाला असून इतर तिघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सर्व मुलांना त्वरित हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र हिंदुजा रुग्णालयाकडून दोन मुलांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. कार्तिक चौधरी (वय ८) आणि सविता पाल (वय १२) या दोघांचा मृत्यू झाला. जखमी मुलांवर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या पाच मुलांना बुडताना पाहून तेथील स्थानिक वाचवण्यासाठी धावले. स्थानिकांनीच मुलांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पालिकेच्या आपत्ती विभागाला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना कळवण्यात आली असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. विकास गल्ली, हनुमान मंदिर, वरळी कोळीवाडा या ठिकाणी ही घटना घडली. यातील कार्तिकी गौतम पाटील (वय १३) हिच्यावर उपचार सुरू आहेत. आर्यन चौधरी (वय १०) याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत, तर ओम चंद्रजीत पाल (वय १४) याच्यावर अपघात कक्षात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.