शिवडी बीडीडीतील रहिवासी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवडी बीडीडीतील रहिवासी आक्रमक
शिवडी बीडीडीतील रहिवासी आक्रमक

शिवडी बीडीडीतील रहिवासी आक्रमक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : शिवडी बीडीडी चाळ पुनर्विकासासासाठी आवश्यक असणारे धोरण केंद्र सरकार ठरवत नसल्याने याविरोधात रहिवासी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी २१ नोव्हेंबरला शिवडी स्थानकाबाहेरील बीडीडी चाळ क्रमांक ९ समोर लाक्षणिक साखळी उपोषण करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे. या उपोषणाला शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
शहरातील वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गांवरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. त्यानुसार म्हाडाने या चाळींच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. त्यानुसार नायगाव, वरळी येथील चाळींच्या पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. नायगाव येथील कामालाही सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केंद्राच्या मान्यतेअभावी रखडला आहे. शिवडी बीडीडी चाळी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर आहेत. येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी विविध पक्ष आणि संघटनांनी केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यानुसार मुंबई पोर्ट ट्रस्टने २०१८ मध्ये चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाला मान्यता दिली आहे. त्यानुसार हा प्रस्ताव बंदरे व जलवाहतूक विभागाकडे २०१९ मध्ये पाठविण्यात आला आहे. मात्र बीपीटीच्या जमिनीवर घरे बांधण्याचे कोणतेही धोरण नसल्याचे कारण केंद्राकडून सांगण्यात येत आहे, असे समजते.