म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींच्या 
पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी
म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी

म्हाडाच्या पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या पुनर्रचित इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय आठवडाभरात जाहीर करण्यात येणार असल्याने रहिवाशांचे मोठ्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मध्य मुंबईत असलेल्या ३८८ पुनर्रचित इमारती जीर्ण झाल्या आहेत. या इमारतींच्या दुरुस्तीचा खर्च मंडळामार्फत करण्यात येत आहे. यामुळे मंडळाला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पुनर्रचित इमारती या ४० ते ५० वर्षे जुन्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी रहिवाशी म्हाडाकडे विनंती करत होते; मात्र कायदेशीर पेचामुळे पुनर्विकास करण्यात अडथळा येत होता. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव म्हाडाने नगरविकास विभागाकडे पाठवला होता.
या इमारतींच्या पुनर्विकासासाठी काही संघटनांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी विकास नियंत्रण नियमावलीमध्ये बदल करून इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत आठवडाभरात निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. पुनर्विकासाबाबतचा निर्णय झाल्यास पुनरर्चित इमारतींमध्ये वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांना मोठ्या आकाराची घरे मिळणार आहेत.