उद्धवाहकामुळे दमछाक टळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्धवाहकामुळे दमछाक टळणार
उद्धवाहकामुळे दमछाक टळणार

उद्धवाहकामुळे दमछाक टळणार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : कांदिवली पूर्व येथील सांस्कृतिक कॉम्प्लेक्स या महापालिकेच्या भांडार विभागाच्या जुन्या इमारतीला तीन नवीन उद्‍वाहने बसवण्यात येणार आहेत. या इमारतीमधील जुने उद्‍वाहन नादुरुस्त झाले होते. नव्या उद्‍वाहनाच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

आर-मध्य विभागातील सांस्कृतिक कॉम्प्लेक्स इमारतीत महापालिकेच्या इतर विभाग कार्यालयांकरिता जागा उपलब्ध करण्याची परवानगी आयुक्तांनी दिली आहे. त्यानुसार या इमारतीत सध्या असलेल्या प्रत्येकी तीन टनाच्या तीन मालवाहनांसाठी उद्‍वाहने काढून त्या ठिकाणी प्रत्येकी २० प्रवासी, १३६० किलो क्षमतेच्या तीन उद्‍वाहने कार्यान्वित करण्याचे कार्यकारी अभियंता (आर मध्य) यांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार सांस्कृतिक कॉम्प्लेक्स येथील या तीन नव्या उद्‍वाहनांची उभारणी करण्यात येणार आहे.
या नव्या तीन उद्‍वाहनांच्या उभारणीसाठी ९४ लाख ९१ हजार ७१९ यासह तीन वर्षे हमी कालावधीनंतर दोन वर्षांकरिता बहुव्यापक सेवा व पर्यरक्षण कंत्राटाचा खर्च १० लाख १६ हजार ६३० असा एकूण खर्च १ कोटी ५ लाख ८ हजार ३४९ रुपये इतका होणार आहे. हा खर्च महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विद्युत शाखेच्या २०१८-१९ च्या चालू दरतालिकेनुसार तयार केला आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर या कामाच्या निविदा प्रक्रियेसाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते.

--------------
अंतिम मंजुरीनंतर कामाला सुरुवात
मेसर्स ईरॉस एलिव्हेटर्स ॲण्ड एस्केलेटर्स यांनी ८६ लाख ३९ हजार ६६० रुपये या सर्वांत कमी रकमेची निविदा भरल्याने त्यांना हे कंत्राट देण्यात आले आहे. हे काम कंत्राटदाराला १२ महिन्यांत पूर्ण करायचे आहे. पालिका आयुक्तांच्या अंतिम मंजुरीनंतर कामात सुरुवात होणार असल्याची माहिती एका पालिका अधिकाऱ्याकडून देण्यात आली.