बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडावर मोर्चा
बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडावर मोर्चा

बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडावर मोर्चा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासातील रहिवाशांसाठी राखीव ठेवण्यात आलेली संक्रमण शिबिरे राज्य सरकारने वरळी शिवडी प्रकल्पातील बाधितांना दिली आहेत. या निर्णयाविरोधात अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे वरळी बीडीडी प्रकल्पाला खीळ बसू शकते, असा आरोप समितीने केला आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी समितीच्या वतीने सोमवारी (ता. २१) म्हाडावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली असून पुनर्वसन इमारतीचे काम प्रगतिपथावर आहे. पुनर्विकासासाठी येथील रहिवाशांच्या तात्पुरत्या वास्तव्यासाठी सेंच्युरी मिल येथील सदनिका राखीव ठेवल्या आहेत. त्यानुसार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींमधील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्यात आले आहे; तर इतर सात इमारतींमधील रहिवासी संक्रमण शिबिरात जाण्यास तयार असतानाच सरकारने येथील इमारती वरळी शिवडी उन्नत मार्ग प्रकल्पात बाधित होणाऱ्या रहिवाशांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाला खीळ बसू शकते, असा दावा समितीने केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी समिती आक्रमक झाली आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, या मागणीसाठी समितीच्या वतीने म्हाडा मुख्यालयासमोर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.