मुंबई दिवसभरात आढळले आठ कोरोना रूग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई दिवसभरात आढळले आठ कोरोना रूग्ण
मुंबई दिवसभरात आढळले आठ कोरोना रूग्ण

मुंबई दिवसभरात आढळले आठ कोरोना रूग्ण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : मुंबईतून कोरोना हद्दपार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी दिवसभरात कोरोनाबाधित ८ रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ११ लाख ५४ हजार ७७९ वर पोहोचली आहे; तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९ हजार ७४३ वर पोहोचली आहे. दरम्यान, दिवसभरात २२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ८८७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईत १४९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.