मुंबईच्या किमान तापमानात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या किमान तापमानात घट
मुंबईच्या किमान तापमानात घट

मुंबईच्या किमान तापमानात घट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १९ : दिवाळीनंतर सामान्यतः नोव्हेंबरपासून थंडीचे आगमन होते; त्यानुसार राज्याच्या काही भागांत गुलाबी थंडीने आगमन केले असताना, मुंबईच्या वातावरणात मात्र उकाडा जाणवत होता. घामाघूम झालेल्या नागरिकांना आता गुलाबी थंडीने चाहूल देण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईचे किमान तापमान २० अंशांनी खाली आले होते. परिणामी सकाळच्या आल्हाददायक वातावरणाचा मुंबईकर पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत.

मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून गुलाबी थंडीची चाहूल सुरू झाली आहे. शिवाय सायंकाळी गारव्यात काहीशी वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री सांताक्रूझ येथे २१.४ अंश; तर कुलाबा २३.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले होते. त्यात आणखी घट होऊन शनिवारी सांताक्रूझ येथे २०.७; तर कुलाबा येथे २३ अंश सेल्सियसपर्यंत खाली आले. कुलाबा येथील किमान तापमानात साधारणतः एका अंशाने घट झाली आहे.

कमाल तापमान चढेच
१) गुलाबी थंडीच्या आगमनाने मुंबईकर सुखावले असले तरी कमाल तापमान जास्तच आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत तापमानात घट झाली आहे. सांताक्रूझ येथे ३२, तर कुलाब्यात कमाल ३२.९ अंश तापमानाची नोंद झाली.
२) तीन दिवसांपूर्वी सांताक्रूझ ३५.१ आणि कुलाबा ३३.४ अंश तापमानाची नोंद झाली होती. सद्यस्थितीत सायंकाळपासून काहीसा गारवा जाणवू लागला आहे. दुपारी उष्मा जाणवत असला तरी त्याची झळ कमी झाली आहे.