आज राज्यात कोरोनाचे ७८ नवे रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज राज्यात कोरोनाचे ७८ नवे रुग्ण
आज राज्यात कोरोनाचे ७८ नवे रुग्ण

आज राज्यात कोरोनाचे ७८ नवे रुग्ण

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : राज्यात आज ७८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. आज ६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ७९,८५,९९८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१७ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्युदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,५५,२९,९२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८१,३५,२१३ (०९.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज ८११ सक्रिय रुग्ण आहेत.