वाशीथ संविधान जनजागृती अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशीथ संविधान जनजागृती अभियान
वाशीथ संविधान जनजागृती अभियान

वाशीथ संविधान जनजागृती अभियान

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : वाशीत बुधवारी (ता. २३) भारतीय संविधान जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्‍घाटन संविधान फाऊंडेशन- नागपूरचे माजी आयएएस अधिकारी ई. झेड. खोब्रागडे करणार असून संविधानतज्ज्ञ ॲड. सुरेश माने हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालय अभिवक्ता ॲड. पल्लवी राजपक्ष भूषविणार आहेत. ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक राहुल गडपाले विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जीएसटी विभागाचे मुंबई विभागीय सहायक आयुक्त पुष्पराज दहिवले आणि साहित्यिक व यशदा पुणेचे प्रभारी अधिकारी डॉ. बबन जोगदंड हेही विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वतंत्रपणे व स्वाभिमानाने जगण्याचा हक्क प्रदान केला आहे. लोकशाही प्रगल्भ करणे, समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व हक्क या कर्तव्याची जाणीव सर्वांमध्ये निर्माण व्हावी, ही प्रत्येक भारतीयाची, तसेच शासन-प्रशासन प्रतिनिधींची मुख्य जबाबदारी आहे. याकरिता संविधान जनजागृती अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.