सिनेटच्या मतदार नोंदणीला मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिनेटच्या मतदार नोंदणीला मुदतवाढ
सिनेटच्या मतदार नोंदणीला मुदतवाढ

सिनेटच्या मतदार नोंदणीला मुदतवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : मुंबई विद्यापीठाच्या प्राचार्य, संचालक, महाविद्यालयीन अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि विभाग प्रमुख या सिनेटच्या मतदार नोंदणीला २८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व सिनेटच्या मतदार नोंदणीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया, मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेसाठीची (सिनेट) निवडणुकीसाठी पदवीधरांच्या नोंद वहीत नोंद करणे आणि नोंदणीकृत पदवीधरांच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे यासाठीची प्रक्रिया १० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे. यामध्‍ये प्राचार्य, संचालक, महाविद्यालयीन अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि विभागप्रमुख या सिनेटच्या मतदार नोंदणीसाठी १९ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती, मात्र असंख्य मतदारांना आपली नावे या दरम्यान नोंदवता न आल्याने त्याविषयी प्राध्यापक आणि विभाग प्रमुखांनी निवेदन देत ही मुदतवाढ करण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने ही मुदतवाढ दिली आहे. मात्र यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.