महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखती पुढे ढकलल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 
कुलगुरूपदाच्या मुलाखती पुढे ढकलल्या
महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : कुलगुरू निवडीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे यशवंतराव चव्हाण मराराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूसाठी २५ आणि २६ नोव्हेंबरदरम्यान मुलाखती घेतल्या जाणार होत्या. त्यासाठी २८ उमेदवारांना मुलाखतीचे पत्र कुलगुरू शोध समितीकडून पाठवण्यात आली होती; मात्र आता या मुलाखती यूजीसीच्या नियमांच्या आधारे घेतल्या जाणार असल्याने कुलगुरू निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मुक्त विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १२६ हून अधिक अर्ज आले होते. छाननीनंतर २८ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते; मात्र आता ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे.