स्वयंरोजगारानेच देशाची अर्थव्यवस्था समृद्ध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वयंरोजगारानेच देशाची अर्थव्यवस्था समृद्ध!
स्वयंरोजगारानेच देशाची अर्थव्यवस्था समृद्ध!

स्वयंरोजगारानेच देशाची अर्थव्यवस्था समृद्ध!

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : युवकांनी ‘नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे’ होण्यासाठी तयार व्हावे, त्यांच्यासाठी देशभरात खूप मोठ्या संधी वाट पाहत आहेत. त्यासाठी युवकांनी स्वतःला तयार करावे. त्यातूनच देशाची अर्थव्यवस्था समृद्ध होईल, असे मत स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय संघटक कश्मिरीलाल यांनी केले. ‘स्वावलंबी भारत अभियान’अंतर्गत पश्चिम क्षेत्राचे दोन दिवसीय प्रशिक्षण नुकतेच वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील आचार्य विद्यासागर महाराजांच्या निकलंक निकेतनच्या आवारात संपन्न झाले. या वेळी स्वदेशी जागरण मंचाचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी, विदर्भ, गुजरात, सौराष्ट्र व गोवा प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.