महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत राज्यांच्या सूचनांचा विचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत राज्यांच्या सूचनांचा विचार
महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत राज्यांच्या सूचनांचा विचार

महिला आर्थिक सक्षमीकरणाबाबत राज्यांच्या सूचनांचा विचार

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व राज्यांतून आलेल्या सूचनांचा विचार जाणून घेऊन सर्वसमावेशक धोरण बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर विषय सादर करणार आहोत, असे मत केंद्रीय महिला व बालविकास विभागाचे सचिव इंदेवर पांडे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ते ७ जानेवारीदरम्यान देशातील सर्व राज्यांचे मुख्य सचिवांची सातवी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या सभेची पूर्वतयारी म्हणून सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत केंद्रीय महिला व बालविकास विभागाचे सचिव इंदेवर पांडे बोलत होते.
या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव (साप्रावि) नितीन गद्रे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन ननाटिया, कामगार विभागाच्या सचिव विनिता सिंगल, महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त आर. विमला, एकात्मिक बाल विकास विभागाच्या आयुक्त रुबल अग्रवाल याच्यासह इतर या वेळी उपस्थित होते.
...
महाराष्ट्र प्रमुख राज्य
केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याला ७ व्या राष्ट्रीय परिषदेच्या पूर्वतयारी साठी ‘महिलांचे आर्थिक सक्षमीकरण’ यात प्रमुख राज्य जाहीर केले आहे; तर सह राज्य म्हणून तमिळनाडूचा सहभाग असून उर्वरित १६ राज्ये यामध्ये सहभागी आहेत. महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली तसेच नीती आयोग व इतर १७ राज्यांच्या प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत ही बैठक आयोजित केली आहे.