विकसकांना हवी मुद्रांक शुल्कात सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विकसकांना हवी मुद्रांक शुल्कात सवलत
विकसकांना हवी मुद्रांक शुल्कात सवलत

विकसकांना हवी मुद्रांक शुल्कात सवलत

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : यंदा मुंबई महापालिका क्षेत्रात घरविक्रीमध्ये घट झाली आहे. बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्क कमी करावे, अशी मागणी विकसकांकडून होऊ लागली आहे. मुद्रांक शुल्कात सवलत देऊन घर खरेदीदारांना दिलासा दिल्यास घरांची विक्री पुन्हा वाढेल, अशी मागणी विकसक करू लागले आहेत.
कोरोनानंतर बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी २०२० मध्ये मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आली होती. ती सवलत बंद केल्याने पुन्हा खरेदी मंदावली आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये ८ हजार ५७६ घरांच्या विक्रीची नोंद झाली होती. मात्र यंदाच्या ऑक्टोबरमध्ये दिवाळी सण असतानाही घरांची मागणी असूनही विक्रीचा वेग कमी दिसून आला. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८ हजार २७६ घरांची विक्री झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. व्याजदरात होत असलेल्या वाढीमुळे घर खरेदीवर परिणाम झाला आहे. यामुळे घर खरेदीला चालना देण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात कपात करावी, अशी मागणी बृहन्मुंबई डेव्हलपर असोसिएशनचे उपाध्यक्ष हरीश कुमार जैन यांनी केली आहे.