‘मुलुंड ते घाटकोपरमधील उघडे मॅनहोल बंद करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मुलुंड ते घाटकोपरमधील उघडे मॅनहोल बंद करा’
‘मुलुंड ते घाटकोपरमधील उघडे मॅनहोल बंद करा’

‘मुलुंड ते घाटकोपरमधील उघडे मॅनहोल बंद करा’

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : रस्त्यावर असलेल्या खुल्या मॅनहोलमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असतो, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयाने आज मुलुंड ते घाटकोपर परिसरात असलेले उघडे मॅनहोल तातडीने बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले.
विरारमध्ये खड्डेयुक्त रस्त्यावर खुल्या असलेल्या मॅनहोल्समध्ये पडून झालेल्या महिलेच्या मृत्यूसंबंधित याचिकेवर आज मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या वेळी पूर्व द्रुतगती महामार्गावर असलेल्या धोकादायक मॅनहोलची माहिती याचिकादारांकडून खंडपीठाला देण्यात आली. मुलुंड ते घाटकोपर परिसरात अनेक मॅनहोल उघडे असून ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे या वेळी सांगण्यात आले. न्यायालयाने याबाबत महापालिकेच्या वकिलांना प्रश्न विचारले. तसेच शुक्रवारी या कामाबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश दिले असून सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले.
...
आयुक्तांकडून हमी
मुंबईमधील रस्तेदुरुस्तीबाबत महापालिकेच्या वतीने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी खंडपीठाला हमी दिली आहे. तसेच याबाबत प्रक्रियादेखील सुरू केली आहे, असे या वेळी सांगण्यात आले. खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीदेखील या वेळी खंडपीठाने घेतली.