कर सहायक संवर्गाच्या उमेदवारांची यादी जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर सहायक संवर्गाच्या उमेदवारांची यादी जाहीर
कर सहायक संवर्गाच्या उमेदवारांची यादी जाहीर

कर सहायक संवर्गाच्या उमेदवारांची यादी जाहीर

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२१ मधील कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांची यादी निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.

खेळाडूंसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिकाऱ्यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्यांचा अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग तसेच माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षांचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी न्यायालय, न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी स्वरूपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्वंतत्ररीत्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे उपसचिव यांनी सांगितले.