मलिकांच्या जामिनावर ३० नोव्हेंबरला निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलिकांच्या जामिनावर ३० नोव्हेंबरला निर्णय
मलिकांच्या जामिनावर ३० नोव्हेंबरला निर्णय

मलिकांच्या जामिनावर ३० नोव्हेंबरला निर्णय

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मनीलॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर विशेष न्यायालयात ३० नोव्हेंबरला निर्णय होणार आहे. अद्याप जामिनाच्या निकालावर काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे गुरुवारी (ता. २४) यावर निकाल होऊ शकला नाही, असे विशेष न्या. राहुल रोकडे यांनी सुनावणीवेळी स्पष्ट केले. चालू वर्षी फेब्रुवारीमध्ये मलिक यांना अटक करण्यात आली आहे. गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदारांकडून सुमारे ३० वर्षांपूर्वी जमीन मालमत्तेचा व्यवहार केला, असा आरोप ईडीने मलिक यांच्यावर ठेवला आहे. मलिक सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्यांच्यावर नुकतेच उपचार झाले आहेत. केवळ राजकीय आकसाने माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे, असा बचाव मलिक यांनी केला आहे. ईडीने मलिक यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. या प्रकरणात दाऊदच्या भावालाही अटक करण्यात आली आहे.