पतीचा घटस्फोटाची याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीचा घटस्फोटाची याचिका फेटाळली
पतीचा घटस्फोटाची याचिका फेटाळली

पतीचा घटस्फोटाची याचिका फेटाळली

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : पत्नी एचआयव्ही बाधित आहे, असे धादांत खोटे सांगणाऱ्या पतीने घटस्फोट घेण्यासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. पुणे न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात पत्नीने २०११ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पतीने पत्नीवर वैद्यकीय आधाराशिवाय आरोप केले आणि नातेवाईक मित्र-मंडळींना याची खोटी माहिती दिली. यामुळे पत्नीला मानसिक त्रास सहन करावा लागला, असे न्यायालयाने सुनावले आणि पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळली.

पत्नीला एचआयव्हीची लागण झाली आहे. त्यापूर्वी तिला अन्य दुर्धर आजार झाले होते, यामुळे माझी मानसिक अवस्था तणावपूर्ण झाली आहे, असा बनाव याचिकेत केला होता; मात्र या आरोपांबाबत कोणतीही कागदपत्रे किंवा वैद्यकीय अहवाल त्याने दाखल केला नाही. पत्नीने पतीच्या दाव्याचे न्यायालयात खंडन केले आहे. एचआयव्ही संबंधित वैद्यकीय चाचणीचा माझा अहवाल नकारात्मक आला आहे; मात्र तरीही पती सर्वांना माझ्याबद्दल चुकीची माहिती देतात, असा दावा तिने केला. न्या. नितीन जामदार आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने हा दावा मान्य केला.