तक्रारीवर निर्णय न झाल्याने याचिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तक्रारीवर निर्णय न झाल्याने याचिका
तक्रारीवर निर्णय न झाल्याने याचिका

तक्रारीवर निर्णय न झाल्याने याचिका

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : मुलुंडमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या विरोधात महारेरामध्ये दीड वर्षापूर्वी केलेल्या तक्रारीवर अद्याप सुनावणी न झाल्यामुळे महिला ग्राहकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठापुढे नुकतीच सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत खुलासा करण्याचे निर्देश सरकारी वकिलांना दिले आहेत.

महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीकडे (महारेरा) महिला ग्राहक, तिचे पती आणि सासरे यांनी तक्रार केली होती. २०११ मध्ये १.१२ कोटीला त्यांनी सदनिका खरेदी केली होती. २०१४ मध्ये त्यांना सदनिकेचा ताबा मिळणार होता; मात्र त्यांना २०१९ मध्ये जागेचा ताबा मिळाला. तसेच सदनिकेच्या मालमत्ता कर नोंदणीमध्येदेखील चूक करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी महारेरामध्ये तक्रार दाखल केली; मात्र यावर मागील दीड वर्षे सुनावणी झाली नाही. याची दखल घेत न्यायालयाने सरकारी वकिलांना खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. महारेराकडून याबाबत माहिती घ्यावी आणि न्यायालयात दाखल करावी, असे निर्देशही खंडपीठाने दिले. याचिकेवर पुढील सुनावणी १२ डिसेंबरला होणार आहे.