बँक ऑफ बडोदाचा देशभर शेतकरी पंधरवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ बडोदाचा देशभर शेतकरी पंधरवडा
बँक ऑफ बडोदाचा देशभर शेतकरी पंधरवडा

बँक ऑफ बडोदाचा देशभर शेतकरी पंधरवडा

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ ः देशाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हितासाठीच्या असलेल्या सरकारी योजना त्यांना सांगण्यासाठी बँक ऑफ बडोदातर्फे शेतकरी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.

यादरम्यान देशातील साडेचार लाख शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल. या पंधरवड्यात या शाखांतर्फे शेतकरी बैठका, किसान मेळावे आयोजित करून बडोदा किसान क्रेडिट कार्ड, ट्रॅक्टर कर्ज, सोनेतारण कर्ज, संयुक्त कर्ज गट, कृषी संबंधित इतर बाबींसाठी मिळणारे कर्ज, तसेच शेतकऱ्यांसाठी अन्य ऑफर यांची माहिती दिली जाईल. शेतकऱ्यांना कर्ज घेता यावे, यासाठी बँकेने डिजिटल सेवाही सुरू केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेल्या विविध योजना उदा. आत्मनिर्भर भारत पॅकेज, अंतर्गत कृषी पायाभूत सुविधा फंड, पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास मंडळ, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना, मायक्रो फूड प्रोसेसिंग इंटरप्राईज योजना अशांचीही माहिती यावेळी दिली जाईल.

सप्टेंबरअखेरपर्यंत बँकेने शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपयांहूनही जास्त रकमेची कर्जे दिली आहेत. बँकेकडून कृषी कर्ज घेण्यासाठी https://bit.ly/AGRILoan हे संकेतस्थळ असल्याची माहिती बँकेचे एमडी व सीईओ संजीव चढ्ढा यांनी दिली.

सौर ऊर्जेसाठी कर्ज
.........................
छोट्या उद्योगांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारावेत, यासाठी त्यांना कर्ज देण्यासाठी बँक ऑफ बडोदाने एरेम सोल्युशन्स व त्यांची एरेम फायनान्स प्रा. लि. यांच्याशी सहकार्य केले आहे. या योजनेनुसार छोट्या व सूक्ष्म उद्योगांना सौर पट्ट्या उभारण्यासाठी तारणविरहित कर्ज दिले जाईल. एरेम सोल्युशन्सतर्फे सौर ऊर्जा निर्मिती पट्ट्या छतावर उभारून दिल्या जातात. त्यासाठी एरेम फायनान्स ही रिझर्व बँकेकडील नोंदणीकृत बिगरबँक वित्तसंस्था असून त्यांच्यातर्फे यासाठी वित्तसाह्य दिले जाते. सौरऊर्जा निर्मिती पट्ट्यांच्या वापरामुळे छोट्या उद्योगांचे वीज बिल कमी होईलच, पण त्यांचा नफाही वाढेल. तसेच स्वच्छ स्रोतांपासून ऊर्जानिर्मिती केल्याने प्रदूषणही कमी होईल, अशी माहिती बँकेच्या एमएसईबी विभागाचे अध्यक्ष ध्रुवाशीश भट्टाचार्य यांनी दिली.