पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान
पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान

पर्यावरणासाठी काम करणाऱ्यांचा सन्मान

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : पर्यावरणाच्या जपणुकीसाठी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या सेवाव्रतींचा आज महिंद्र ऑटोमोटिव्हतर्फे राईज महिंद्र सस्टेनेबिलिटी चॅम्पियन ॲवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला. पर्यावरणात बदल करण्याचे हेतूने हे पुरस्कार दिल्याचे महिंद्रतर्फे सांगण्यात आले.

पर्यावरणातील हवा, पाणी यात सध्या होणारे बदल आपण पाहतच आहोत. या परिस्थितीत आपल्याला बदल घडवून आणायचा आहे. महिंद्र आणि महिंद्रचा हेतू फक्त नफा मिळवणे हा नसून या दृष्टीने काहीतरी वेगळे करण्यास सर्वांना प्रोत्साहन देणे हा आहे. जेणेकरून समाजावर चांगला परिणाम होऊ शकेल, असे महिंद्रचे कार्यकारी संचालक (वाहन व कृषी) राजेश जेजुरीकर यांनी सांगितले.

यानुसार लाखो झाडे लावून हवा शुद्ध करण्यासाठी धडपडणारे अपूर्व भंडारी, सौर ऊर्जा पॅनल निर्माण करणाऱ्या कंपनीचे सिमरप्रीत सिंह, सायकल चालवण्यास उत्तेजन देणाऱ्या निकिता ललवाणी तसेच हॉटेलमध्ये वाया जाणारे पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मोहीम चालवणाऱ्या गर्विता गुल्हाटी यांना गौरवण्यात आले. त्यांना मानपत्र आणि महिंद्र कारखान्यातील भंगारापासून बनवलेले सुबक चषक देऊन गौरवण्यात आले.

महिंद्रची ईव्ही एसयूव्ही
..............................
पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात विजेवर चालणारी वाहने महत्त्वाची आहेत. विजेवर चालणाऱ्या तीनचाकी बनवण्यातही आमचा मोठा वाटा आहे. २०२७ पर्यंत आम्ही तयार करणाऱ्या एसयूव्हीपैकी ३० टक्के गाड्या या विजेवर चालणाऱ्या असतील. डिसेंबरमध्ये महेंद्रच्या पहिल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही निर्मिती होईल. जानेवारीपासून तिचे बुकिंगही सुरू होईल, महिंद्रचे कार्यकारी संचालक (वाहन व कृषी) राजेश जेजुरीकर यांनी सांगितले.