दाऊदी बोहरा वारसा हक्काच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाऊदी बोहरा वारसा हक्काच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ
दाऊदी बोहरा वारसा हक्काच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ

दाऊदी बोहरा वारसा हक्काच्या अंतिम सुनावणीला प्रारंभ

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २८ : बहुचर्चित दाऊदी बोहरा वारसा हक्क दाव्याच्या मुंबई उच्च न्यायालयातील अंतिम सुनावणीला आजपासून प्रारंभ झाला. सय्यदना खुजैमा कुतबुद्दीन यांच्या वतीने न्या. गौतम पटेल यांच्या न्यायालयात आज बाजू मांडण्यात आली. सय्यदना बुर्हाद्दीन यांनी त्यांना १९६५ मध्ये वारस म्हणून नियुक्त केले होते असा दावा केला. एकावन्नावे दाईच्या निधनाच्या २८ दिवसांनंतर ही नियुक्ती केली होती. बावन्नावे दाय यांनीदेखील याला मान्यता देऊन जाहीरपणे याची घोषणा केली होती. जून २०११ मध्ये सय्यदना बुर्हाद्दीन यांच्या मुलाने वारस पदावर हक्क दाखवला होता. ॲड. आनंद देसाई यांनी एक हस्तलिखित पत्र दाखल केले असून, ५१ व्या दाईंच्या मुलाचे ते नोव्हेंबर १९७१ मधील पत्र आहे. यानुसार बुर्हाद्दीन आणि कुतुबुद्दिन यांना एकाच इमामाकडून ताईद मिळाली आहे, असे स्पष्ट होते असा युक्तिवाद केला.