एलअँडटीला पर्यावरण संलग्न कर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलअँडटीला पर्यावरण संलग्न कर्ज
एलअँडटीला पर्यावरण संलग्न कर्ज

एलअँडटीला पर्यावरण संलग्न कर्ज

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः सुमितोमो बँकिंग कॉर्पोरेशनने लार्सन अँड टुब्रोला पर्यावरणविषयक उपायांशी संलग्न असे दहा कोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज दिले आहे. कंपनीच्या पर्यावरणविषयक उपाययोजना पूर्ण होत जातील तसा या कर्जाचा व्याजदर कमी होत जाईल.
हे कर्ज म्हणजे एल अँड टीच्या पर्यावरणपूरक धोरणाला मिळालेली पावती असल्याचे सांगितले जात आहे.

कंपनीने निश्चित केल्यानुसार पर्यावरणाला हानिकारक वायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे, तसेच पाण्याचा फेरवापर आणि पाण्याची शुद्धता या दोघांबाबत लार्सन अँड टुब्रोने ठरवलेली उद्दिष्टे पूर्ण होण्याशी या कर्जाचा व्याजदर निगडित राहील. कंपनीच्या दीर्घकालीन धोरणानुसारच ही लक्ष्ये निर्धारित करण्यात आली आहेत. सन २०४० मध्ये कंपनीच्या प्रकल्पांमधून कार्बनडाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन पूर्णपणे बंद करण्याचे ध्येय निश्चित केले आहे; तर त्यापूर्वी पाच वर्षे पाण्याचा वापर कमी करून त्याचे संपूर्ण शुद्धीकरण व फेरवापर करण्याचे कंपनीचे ध्येय आहे. पर्यावरण स्वच्छतेच्या लढ्यातील आमच्या दीर्घकालीन उद्दिष्टात हे कर्ज म्हणजे महत्त्वाचा टप्पा आहे, असे ग्रुपचे सीएफओ आणि पूर्णवेळ संचालक आर. शंकर रामन म्हणाले.