आयसीआयसीआयतर्फे स्टॅक सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीआयसीआयतर्फे स्टॅक सेवा
आयसीआयसीआयतर्फे स्टॅक सेवा

आयसीआयसीआयतर्फे स्टॅक सेवा

sakal_logo
By

मुंबई, ता. १ ः आयसीआयसीआय बँकेने स्टॅक ही सेवा सुरू केली आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक तसेच गुंतवणूकदार यांची सर्व कामे एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर करण्यासाठी ही सेवा उपयोगी पडेल. त्यामुळे या सर्वांचीच कामे सहजतेने होतील, असे बँकेकडून सांगण्यात आले.

बँकेतर्फे मागील वर्षी कंपन्यांसाठी अशी सेवा सुरू करण्यात आली होती. आता बांधकाम व्यावसायिकांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. डिजिटल बँक खाते उघडणे, रेरा रजिस्ट्रेशन करून त्याचा खाते क्रमांक मिळवणे, कर्जे, अर्थसाह्य, भाडेपट्टा तयार करणे आदी कामे स्टॅकमार्फत करता येतील. त्याचप्रमाणे बिल्डरांच्या विक्रेत्यांना पैसे देणे, कर्मचाऱ्यांचे वेतन, सेवा पुरवठादारांशी व्यवहार करणे तसेच इतर सरकारी देयके देणे, परकीय चलनाचे व्यवहार आदी सर्व व्यवहार स्टॅकमार्फत होतील.

रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आणि अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड यांनादेखील त्यांची आर्थिक कामे म्हणजे कस्टोडियन सर्विस, डिजिटल कलेक्शन स्टॅकमार्फत करता येतील. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमार्फत मालमत्ता व रिअल इस्टेट प्रॉपर्टी क्षेत्रातील बड्या गुंतवणूकदारांच्या निधीचे व्यवस्थापन केले जाते. त्यामार्फत भाडेतत्त्वावर मिळणारे उत्पन्न जमा करून त्यातील नफा गुंतवणूकदारांना वितरित केला जातो; तर अल्टरनेट इन्व्हेस्टमेंट फंड हा एकत्रित निधी असतो. या दोन्ही प्रकारच्या निधी व्यवस्थापकांना या सर्व आर्थिक सेवा वेगाने करणे आवश्यक असते, त्या स्टॅकमार्फत होतील.
........
बांधकाम व्यवसाय हे देशातील दुसरे सर्वांत मोठे रोजगार देणारे क्षेत्र आहे. तीन वर्षांत त्याचे जीडीपीमधील योगदान १३ टक्क्यांवर जाईल. त्यामुळे त्यांच्या सर्व गरजा त्वरेने पूर्ण करणारी सेवा आम्ही सादर केली आहे.
- अनुप बागची, कार्यकारी संचालक, आयसीआयसीआय बँक.