राज्यात १८ मुलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात १८ मुलांचा मृत्यू
राज्यात १८ मुलांचा मृत्यू

राज्यात १८ मुलांचा मृत्यू

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १: मुंबईत झपाट्याने पसरणाऱ्या गोवरचा प्रसार आता राज्यातही झाला आहे. राज्यात आतापर्यंत १८ मुलांचा (८ मुली, १० मुलगे) मृत्यू झाला असून, १२ हजार २४१ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७४५ जणांना गोवरची लागण झाली आहे; तर मुंबईतही गोवर बाधित २३ नवीन रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या ३४६ वर पोहोचली आहे.

मुंबईतील गोवंडी परिसरात गोवरचा पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, मालाड, भांडुप आदी परिसरात गोवरचा उद्रेक झाला आहे. मुंबईत गोवरमुळे आतापर्यंत १२ मुलांचा मृत्यू झाला, यापैकी ३ मुले मुंबईबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारी दिवसभरात २३ रुग्ण गोवर बाधित आढळल्याने गोवर बाधितंची संख्या ३४६ वर पोहोचली आहे. तर ८३ रुग्ण संशयित आढळल्याने संशयित रुग्णांची संख्या ४,३५५ वर पोहोचली आहे.

राज्यात गोवरमुळे १८ मृत्यू
वयोगट मृत्यू
० - ११ महिने - ५
१२ महिने ते २४ महिने १०
२५ महिने ते ६० महिने २
६१ महिन्यापेक्षा अधिक १

गोवरचा उद्रेक म्हणजे काय?
एका विशिष्ट भागात चार आठवड्याच्या कालावधीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक गोवर संशयित रुग्ण आढळल्यास आणि त्यापैकी किमान दोन रुग्ण प्रयोगशाळा तपासणीत गोवर बाधित आढळल्यास त्याला गोवर उद्रेक असे म्हणतात.