बेबी टाल्कम पावडर सुरक्षित! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेबी टाल्कम पावडर सुरक्षित!
बेबी टाल्कम पावडर सुरक्षित!

बेबी टाल्कम पावडर सुरक्षित!

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा ठपका ठेवलेल्या जॉन्सन ॲण्ड जॉन्सनच्या ‘बेबी टाल्कम’ पावडरचे उत्पादन निकषांनुसार असून सुरक्षित आहे, असा अहवाल शुक्रवारी दोन प्रयोगशाळांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला. यामुळे कंपनीला दिलासा मिळाला आहे.

न्यायालयाने या उत्पादनाची वेगवेगळ्या प्रयोगशाळेतून चाचणी करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार कंपनीच्या मुलुंड युनिटमधील बेबी पावडरचे तीन दिवसांत नमुने घेऊन नव्याने चाचणीसाठी पाठवा आणि अहवाल सादर करा, असे आदेश खंडपीठाने राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले होते. हे नमुने केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (पश्चिम विभाग), एफडीए प्रयोगशाळा आणि इंटरटेक या मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील खासगी प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.

शुक्रवारी न्या. एस. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारच्या वतीने प्रयोगशाळेकडून तीन सीलबंद अहवाल सादर करण्यात आले. यामध्ये दोन सरकारी प्रयोगशाळांच्या अहवालानुसार बेबी पावडर प्रथमदर्शनी वापरण्यास सुरक्षित आहे, असे स्पष्ट केले आहे. यावर राज्य सरकारने बाजू मांडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणी ६ डिसेंबरला होणार आहे.