गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस फेस्टिव्हलला परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस फेस्टिव्हलला परवानगी
गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस फेस्टिव्हलला परवानगी

गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस फेस्टिव्हलला परवानगी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : प्रभू येशू जन्मोत्सवानिमित्त गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सामाजिक संस्थेला परवानगी दिली आहे. चौपाटीवर विशिष्ट चौरस मीटर परिसरात १५ हजारांहून अधिक सहभागींना सामावून घेता येणार नाही. अशा वेळी तेथे अघटित परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे आदेशात नमूद करत उच्च न्यायालयाने सुमारे २५००० चौमी जागेची परवानगी दिली आहे.

सन १९६५ पासून येशू जन्मोत्सवानिमित्त ख्रिसमस म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी प्रभू येशू जन्मोत्सव सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ११ डिसेंबर रोजी गिरगाव चौपाटीवर ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदा संस्थेला ४१८०.३ चौरस मिटरवर फेस्टिव्हल आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली; मात्र या वर्षी अधिक संख्येने सहभागी येतील, असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे. यासाठी सुमारे २५००० चौमी जागेवर फेस्टिव्हल साजरा करण्याची परवानगी मागण्यात आली होती. न्यायाधीश आर. डी. धनुका यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.