महिलांना पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांना पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण
महिलांना पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

महिलांना पेट्रोल पंप सेवकाचे प्रशिक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः कौशल्य विकास विभाग व रेवती रॉय फाऊंडेशन यांच्यामार्फत महिलांसाठी गॅस स्टेशन, पेट्रोल पंप सेवक या अभ्यासक्रमाचा प्रारंभ नुकताच राज्याचे कौशल्य, रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते झाला. यातून प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना गॅस स्टेशन वा पेट्रोल पंपावर रोजगार मिळेल.

याअंतर्गत १०० महिलांना सात दिवस प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर संस्थेमार्फत ९० दिवसांचे कामाच्या ठिकाणी प्रशिक्षणही देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना मासिक १२ ते १५ हजार रुपये वेतनावर केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस स्टेशन, पेट्रोल पंपावर नियुक्त करण्यात येईल. अल्प उत्पन्न गटातील महिलांच्या कौशल्य विकास आणि रोजगारासाठी हा कार्यक्रम राबवला जातो. वंचित घटकांसाठी विशेषतः अल्प उत्पन्न गटातील महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, महिलांचे प्रतिनिधित्व नसलेल्या क्षेत्रात त्यांना रोजगाराची संधी देणे, अल्प उत्पन्न कुटुबांचे उत्पन्न वाढवणे ही या कार्यक्रमाची उद्दिष्टे आहेत.