‘भिमांजली’तून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भिमांजली’तून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन
‘भिमांजली’तून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

‘भिमांजली’तून डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य, संगीताची विशेष आवड होती. विशेषत: व्हायोलिनचे आर्तगंभीर, गहिरे व करुण स्वर त्यांना अतिशय प्रिय होते. ही बाब लक्षात घेऊन महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरमध्ये सांगीतिक ‘भीमांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती व तालविहार संगीत संस्था यांच्या माध्यमातून उद्या (ता. ६) सकाळी ६ वाजता शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली जाणार असल्याची महिती समितीचे सर्वेसर्वा डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी चैत्यभूमीवर सकाळी ९ वाजता, सायंकाळी ६ वाजता विरोधी पक्षनेते अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, खासदर सुप्रिया सुळे यांची अभिवादन सभा व गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रमही होणार आहे.