सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ येणार
सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ येणार

सुला वाईनयार्ड्सचा आयपीओ येणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : देशातील सर्वांत मोठी वाईन उत्पादक आणि विक्रेती कंपनी सुला वाइनयार्डसचा आयपीओ १२ ते १४ डिसेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत असून त्यासाठी किंमत पट्टा ३४० ते ३५७ रुपयांदरम्यान ठेवण्यात आला आहे. या आयपीओमध्ये किमान ४२ इक्विटी शेअर व त्यापुढे ४२ च्या पटीत शेअरमध्ये गुंतवणूक करता येईल.

एकूण दोन कोटी ६९ लाख शेअर या आयपीओद्वारे विक्रीला आणले जातील. कंपनीचा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यानचा महसूल २२४ कोटी रुपये असून त्यांचा करोत्तर नफा ३० कोटी रुपये आहे. सन २०१९ मध्ये कंपनीचा वाईन बाजारपेठेतील वाटा ६० टक्के होता. भारतातील वाईनचे ८० टक्के उत्पादन या कंपनीतर्फे होते. हे उत्पादन मुख्यतः नाशिक येथे होत असून याच्या वेगळ्या द्राक्षांसाठी त्यांनी शेतकऱ्यांबरोबर १५ हजार हेक्टर जमिनीवरील उत्पादनासाठी करार केले आहेत. कंपनीची ९५ टक्के वाईन विक्री देशातच होते; मात्र चीन आपल्यापेक्षा पंधरा पट जास्त वाईन पितो. त्यामुळे भारतातही वाईन विक्रीला मोठा वाव आहे असे कंपनीचे एम. डी. राजीव सामंत म्हणाले.

२००५ मध्ये नाशिक वायनरीमध्ये सामान्यांसाठी पहिली वाईन टेस्टिंग रूम तयार केली. २००८ मध्ये त्यांनी पहिले वाइनयार्ड रिसॉर्ट बनवले व त्याच वर्षी वाईन थीमवर आधारित म्युझिक फेस्टिवल, सुला फेस्ट सुरू केला. भारतीय वाईनला परदेशात मोठा प्रतिसाद असून आता परदेशातील विक्री गेल्या वर्षीपासून वाढली आहे. तरीही आम्ही देशी विक्रीलाच प्राधान्य देतो, असेही सामंत म्हणाले.