नोडल अधिकारी नियुक्त करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोडल अधिकारी नियुक्त करा
नोडल अधिकारी नियुक्त करा

नोडल अधिकारी नियुक्त करा

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागात येणाऱ्या सर्व वरिष्ठ महाविद्यालय आणि दोन विद्यापीठांमध्ये प्रत्येक ठिकाणी नोडल अधिकारी नेमण्यासाठी विभागाच्या सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी आदेश जारी केले आहेत.
मुंबई उच्च शिक्षण विभागाच्या अंतर्गत १०२ अनुदानित वरिष्ठ महाविद्यालये आणि ८०० हून अधिक इतर खासगी महाविद्यालये येतात. तसेच याच विभागात मुंबई विद्यापीठ आणि एसएनडीटी विद्यापीठाचा कार्यभारदेखील येतो. त्यामुळे दोन्ही विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात नोडल अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असून या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच प्राध्यापकांना नवीन शिक्षण पद्धतीविषयी माहिती देण्याचे काम या नोडल अधिकाऱ्यामार्फत केले जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी अद्याप विद्यार्थी तसेच प्राध्यापकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहे. या धोरणांतर्गत तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमासह चार वर्षे पदवी अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. हा अभ्यासक्रम कसा असेल, त्याचे गुणांकन पद्धत, ऐच्छिक आहे का, असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. नोडल अधिकाऱ्यामार्फत या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
...
प्रत्येक आठवड्याला आढावा
नोडल अधिकाऱ्यांकडून कोणत्या प्रकारची कार्यवाही करण्यात आली, यासाठीचा आढावा प्रत्येक आठवड्यात घेतला जाणार आहे. शिवाय त्याच माध्यमातून प्रशिक्षण आणि इतर कार्यक्रमही घेतले जाणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी होणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सहसंचालिका डॉ. सोनाली रोडे यांनी दिली.