Fri, Feb 3, 2023

मुंबईत गोवरने ४ वर्षीय मुलीचा मृत्यू
मुंबईत गोवरने ४ वर्षीय मुलीचा मृत्यू
Published on : 9 December 2022, 4:57 am
मुंबई, ता. ९ : मुंबईत गोवरचा प्रादुर्भाव वाढत असून कुर्ला येथील चारवर्षीय मुलीचा आज गोवरमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मुलीचे लसीकरण झाले नव्हते. आज दिवसभरात ४६ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ४,८३९ वर पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात २९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत ३८ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत; तर पालिकेतर्फे एकूण ७५,४४,०३८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईत आतापर्यंत १५ मुलाचा मृत्यू झाला आहे. १५ पैकी तीन मुलांचे मृत्यू हे मुंबईबाहेरील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.