
आर्सेलर प्रकल्प एलअँडटी उभारणार आर्सेलर प्रकल्प एलअँडटी उभारणार
मुंबई, ता. ११ ः आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील या स्टील कंपनीच्या गुजरात व ओरिसा येथील संयुक्त प्रकल्पांच्या विस्ताराचे काम एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या मिनरल्स अँड मेटल्स विभागाला मिळाले आहे. हे काम सात हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे आहे. यात हाजिरा येथे ३५ लाख टन क्षमतेचे दोन ब्लास्ट फर्नेस उभारणे तसेच साठ लाख टन क्षमतेचे स्टील मेल्टशॉप उभारणे या कामांचा समावेश आहे. तसेच ओडिशातील सगासाही येथेही ६० लाख टन क्षमतेचा खनिज कामाशी संबंधित प्रकल्प उभारला जाईल. एलअँडटीच्या मिनरल्स व मेटल्स व्यवसायातर्फे खाणीतील खनिजांवर प्रक्रिया करण्यापासून ते धातूनिर्मितीपर्यंतचे प्रकल्प उभारण्याची कामे केली जातात. खाणकाम, रेती उत्पादन प्रकल्प, हायस्पीड रेल्वे इक्विपमेंट तसेच स्टिल, सिमेंट, खते, रसायन प्रकल्प आणि बंदरांसाठी लागणारी यंत्र सामुग्रीही एलअँडटीतर्फे बनवली जाते.