मविआच्या मोर्चाची पूर्वतयारी सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मविआच्या मोर्चाची पूर्वतयारी सुरू
मविआच्या मोर्चाची पूर्वतयारी सुरू

मविआच्या मोर्चाची पूर्वतयारी सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : विविध ज्वलंत विषयांवरून भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे १७ डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चाच्या पूर्वतयारीसाठी नेत्यांनी आज (ता. ११) बैठका घेतल्या.

भाजप मंत्र्यांकडून महापुरुषांचा अपमान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, तसेच राज्यातील भ्रष्टाचाराबाबत जनतेच्या मनातील संतप्त भावना व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा निघणार आहे. शिवसेना (उद्धव गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर घटक पक्ष यांच्यातर्फे हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गाने हा मोर्चा जाईल. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी महाविकास आघाडीचे नेते, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष व माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, माजी मंत्री अनिल परब, मिलिंद नार्वेकर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मधु चव्हाण, हेमंत टकले, आमदार रईस शेख यांच्यासह शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी पाहणी दौरा केला व तयारीचा आढावा घेतला.