Fri, Feb 3, 2023

बिकाजी फूड्सच्या नफ्यात वाढ
बिकाजी फूड्सच्या नफ्यात वाढ
Published on : 12 December 2022, 11:58 am
मुंबई, ता. १२ : परंपरागत देशी खाद्यपदार्थ बनवणारी देशातील तिसरी सर्वांत मोठी कंपनी बिकाजी फूड्स इंटरनॅशनलच्या महसुलात आणि नफ्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांत खाद्यतेल तसेच पॅकिंग मटेरियल या कच्च्या मालाच्या किमती घसरल्याने कंपनीच्या नफ्यात वाढ झाली, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक दीपक अग्रवाल यांनी दिली. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ५७० कोटी रुपये महसूल मिळाला. मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो ४३७ कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीला ४० कोटी रुपये करोत्तर नफा मिळाला. एप्रिल ते सप्टेंबर या सहामाहीचा विचार करता कंपनीला ९९९ कोटी रुपये महसूल मिळाला; तर ५६ कोटी रुपये करोत्तर नफा मिळाला.