विमाछत्रावर भरीव करसवलत हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमाछत्रावर भरीव करसवलत हवी
विमाछत्रावर भरीव करसवलत हवी

विमाछत्रावर भरीव करसवलत हवी

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : भारतात जास्तीत जास्त लोकांना विमा छत्र मिळावे असे वाटत असेल तर सरकारने विमा तसेच मेडिक्लेम यांना आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव करसवलत द्यावी, अशी मागणी एजीस फेडरल लाईफ इन्शुरन्सचे एमडी व सीईओ विघ्नेश शहाणे यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात विमा क्षेत्राला असलेल्या अपेक्षांबाबत ते बोलत होते. महत्त्वाचे म्हणजे विमासंरक्षण सर्वांना मिळावे, यासाठी त्यावरील १८ टक्के जीएसटी हा संपूर्णपणे काढून टाकावा, अशी मागणीही त्यांनी केली.

भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांकडे फारशी सामाजिक सुरक्षितता नसल्याने पेन्शन फंड लोकप्रिय होण्यासाठी जास्त प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्राहकांना पेन्शन फंडातून मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त करावी. कारण त्याचा प्रीमियम कर्मचाऱ्यांच्या करपात्र उत्पन्नातूनच दिला जातो. निदान करपात्र रकमेतून मुद्दलाची रक्कम वगळून ती तरी करमुक्त करावी किंवा पेन्शन फंडातील गुंतवणुकीची वेगळी गटवारी करून तिच्या आयकर सवलत मर्यादेतही भरीव वाढ करून ती ५० ते ७५ हजार रुपये एवढी करावी, असेही शहाणे यांनी सांगितले. आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर मिळणारी आयकर सवलत फक्त पंचवीस हजार रुपये आहे, त्यातही वाढ करावी. कारण गेली दोन वर्षे कोविडचे थैमान सुरू असताना एवढ्या कमी रकमेच्या प्रीमियमचे विमा छत्र पुरेसे नाही, हे सर्वांनाच कळले आहे. विमा संरक्षण हा महत्त्वाचा भाग असला तरी करबचतीसाठीदेखील करदाते विमा आणि मेडिक्लेम घेतात, त्यामुळे त्यात वाढ करावी, अशी आग्रही मागणीही विघ्नेश शहाणे यांनी केली.