Thur, Feb 2, 2023

अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर परिसंवाद
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर परिसंवाद
Published on : 12 December 2022, 1:42 am
मुंबई, ता. १२ : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष उपक्रमांतर्गत उद्या (ता. १३) सायंकाळी ५.३० वाजता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दादर पूर्वेतील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गावसकर सभागृहात होणाऱ्या या परिसंवादाचे अध्यक्षस्थान विचारवंत, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर भूषवणार आहेत. या परिसंवादात ‘अण्णा भाऊ साठे यांचे समग्र साहित्य दर्शन’ या विषयावर डॉ. रणधीर शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे’ या विषयावर डॉ. प्रकाश खांडगे, ‘महाकवी कालिदास आणि अण्णा भाऊ साठे’ या विषयावर प्रा. शिवराज गोपाळे मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी केले आहे.