Sun, Jan 29, 2023

राऊत यांच्या जामिनाविरोधात ६ जानेवारीला सुनावणी
राऊत यांच्या जामिनाविरोधात ६ जानेवारीला सुनावणी
Published on : 12 December 2022, 1:41 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात आरोपी असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी ६ जानेवारीला होणार आहे. ईडीने राऊत यांच्या जामिनाला विरोध केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली; मात्र अद्याप यावर नियमित सुनावणी सुरू झालेली नाही. तसेच विशेष न्यायालयाने राऊत यांना जामीन मंजूर करताना ईडीच्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. यावरही याचिकेत ईडीने आक्षेप घेतला आहे. पत्रा चाळ गैरव्यवहारात मुख्य आरोपी म्हणून राऊत यांना ईडीने दाखवले आहे; पण जे मुख्य विकसक आहेत त्यांना ईडीने का अटक केली नाही, असा प्रश्न विशेष न्यायालयाने उपस्थित केला. राऊत यांच्या अटकेवरही न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.