देशांतर्गत मागणी वाढेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशांतर्गत मागणी वाढेल
देशांतर्गत मागणी वाढेल

देशांतर्गत मागणी वाढेल

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः कोविड कालावधीत कमी झालेली देशातील सर्वसामान्यांची मागणी आता वाढू लागेल. त्याचप्रमाणे खासगी कंपन्यांच्या भांडवली खर्चातही आता वाढ होईल. अमेरिकी फेडरल बँकेने व्याज दरकपात सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे दरकपात होणार नाही हे निश्चित, असे मत कोटक महिंद्र अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा यांनी व्यक्त केले. वर्षभरातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेताना ते बोलत होते. या वेळी हरीष कृष्णन, दीपक अग्रवाल या अन्य अधिकाऱ्यांनीही आपली मते मांडली.

आज जागतिक अर्थव्यवस्था कठीण अवस्थेतून जात असली तरी भारताची परिस्थिती आशादायक आहे, पण अजूनही आपली अवाढव्य आयात, रसातळाला गेलेला खासगी कंपन्यांचा भांडवली खर्च या चिंतेच्या बाबी आहेतच. श्रीमंत व उच्च मध्यमवर्गीयांची मागणी आता वाढली आहेच, पण कोरोनाचा फटका बसलेल्या गरिबांची मागणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र ही वाढ सतत व्हायला हवी, असेही शहा यांनी सांगितले. मागणी वाढू लागल्याने खासगी कंपन्यांच्या भांडवली खर्चातही आता वाढ होईल व त्यामुळे एकंदरितच अर्थव्यवस्था भरारी घेईल. उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेमुळे आज भारतात विकल्या जाणाऱ्या मोबाईलपैकी ९७ टक्के हे स्वदेशी बनावटीचे आहेत. त्यामुळे ही योजना सेमिकंडक्टर चिप, वाहन, बॅटऱ्या, औषधे या क्षेत्रांतही यशस्वी ठरली तर आपली निर्यातही मोठ्या प्रमाणावर वाढेल, असेही या वेळी सांगण्यात आले.