बांधकाम बंदीमुळे प्रदूषणात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम बंदीमुळे प्रदूषणात घट
बांधकाम बंदीमुळे प्रदूषणात घट

बांधकाम बंदीमुळे प्रदूषणात घट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : जी-२० परिषदेमुळे बांधकामांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. परिणामी मुंबईतील धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे हवेचा स्तरदेखील सुधारला असून गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच हवेचा स्तर समाधानकारक नोंदवण्यात आला आहे.
हिवाळ्यातील वाढत्या थंडीसोबत मुंबईतील प्रदूषणही वाढले होते. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढले होते. यामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक ३०० पार झाला होता. अनेक भागांसह मुंबई अनेकदा रेड झोनमध्ये आली होती. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाचे प्रमाण बघून देशभरातील पर्यावरणतज्ज्ञांनीदेखील चिंता व्यक्त केली होती.
मुंबईतील हवेचा स्तर मात्र आज सुधारलेला दिसला. पावसाळ्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत हवेचा स्तर समाधानकारक असल्याचे दिसले. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक १४२ (मध्यम) नोंदवला गेला. गेल्या दोन महिन्यांपासून कुलाबा, माझगाव, मालाड भागात अतितीव्र प्रदूषणाची नोंद झाल्याने या भागाचा समावेश ‘रेड झोन’मध्ये झाली होती. आज मात्र प्रदूषणाची मात्रा कमी झाली असून कुलाबा १०० (समाधानकारक), माझगाव १७३ (मध्यम) आणि मालाड १२८ (मध्यम) हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला गेला. फक्त चेंबूर मध्ये २४९ हवा गुणवत्ता निर्देशांकासह वाईट स्तर नोंदवला गेला.
...
दृश्यमानता धूसर...
मुंबईत मोठे नवीन तसेच पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत. यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले होते. काही अंतरावरील दृश्यमानतादेखील धूसर झाली होती.
मुंबईत सुरू असलेल्या जी-२० परिषदांच्या बैठकांमुळे सुरू असलेल्या बांधकामांवर स्थगिती आणण्यात आली आहे. यामुळे धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी मुंबईतील हवेचा स्तर सुधारला असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांनी म्हटले आहे.
..........
विभाग- हवा गुणवत्ता निर्देशांक-स्तर
मुंबई - १४२ - मध्यम
कुलाबा - १००-समाधानकारक
भांडुप - १०७-मध्यम
मालाड - १२८-मध्यम
माझगाव - १७३-मध्यम
वरळी - ११८-मध्यम
बीकेसी - १५५-मध्यम
अंधेरी - १४५-मध्यम
नवी मुंबई - १०९-मध्यम