
पेटीएममार्फत मोबाईल रीचार्ज
मुंबई, ता. १५ ः पेटीएमची मुख्य कंपनी असलेल्या वन नाईंटी सेव्हन कम्युनिकेशनतर्फे एअरटेल, जिओ, व्ही, बीएसएनएल आदी सर्व मोबाईलच्या प्रीपेड रीचार्जची सुविधा, नूतनीकरणाच्या रिमाइंडरसह देऊ केली आहे. यात ग्राहकांच्या गरजांनुसार रिचार्जचे कित्येक प्लान मिळू शकतील. येथे केवळ एका मिनिटात रिचार्ज होऊ शकते. तसेच त्यावर आपल्या कुटुंबियांच्या अन्य मोबाईलचेही रीचार्ज होऊ शकते.
पेटीएम यूपीआय, पेटीएम वॉलेट, नेटबँकिंग तसेच डेबिट व क्रेडिट कार्डांमार्फत याचे पैसे देता येतात. पेटीएम अॅपवरील रिचार्ज अँड बिल पेमेंटमधील मोबाईल रिचार्जवर जाऊन आपला मोबाईल नंबर टाकावा. आपल्याला हवा तो प्लान निवडा किंवा रिचार्जची रक्कम टाकावी. फास्ट फॉरवर्ड किंवा पे असे दोन पर्याय असतील. फास्ट फॉरवर्डने पेटीएम वॉलेटमधून पैसे वळते होतील; अन्यथा अन्य मार्गांनी पैसे भरावे लागतील.