बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता २५ हजार भाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता २५ हजार भाडे
बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता २५ हजार भाडे

बीडीडी चाळीतील रहिवाशांना आता २५ हजार भाडे

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाने गती घेतली आहे. तिन्ही ठिकाणच्या चाळी पाडण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नागरिकांना संक्रमण शिबिरांमध्ये हलविण्यात येत आहे. संक्रमण शिबिराऐवजी पर्यायी वास्तव्यासाठी नागरिकांना २५ हजार रुपये दरमहा भाडे देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार रहिवाशांना म्हाडाकडून दरमहा २५ हजार भाडे मिळणार आहे.
राज्य सरकारने बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी म्हाडाकडे सोपवली आहे. त्यानुसार प्रकल्पांच्या कामासाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. तिन्ही चाळींच्या ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी म्हाडाने रहिवाशांना त्याच परिसरात संक्रमण शिबिरे उपलब्ध करून दिली आहेत. ही संक्रमण शिबिरे मोफत देण्यात आली आहेत. त्यानुसार करार करणाऱ्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात येत आहे. पुनर्विकासात अडथळा येऊ नये, यासाठी म्हाडाने रहिवाशांना पर्यायी वास्तव्याचे भाडे स्वीकारण्याचा पर्यायही दिला आहे.
...
भाड्यासाठी पत्रव्यवहार
त्यानुसार सरकारने रहिवाशांना दरमहा २२ हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला होता. संघटनांनी भाडे वाढवण्याची मागणी केल्याने म्हाडाने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिल्याने रहिवाशांना पर्यायी वास्तव्यासाठी २५ हजार रुपये भाडे मिळणार आहे. या निर्णयानुसार रहिवाशांना संक्रमण शिबिर नको असल्यास भाड्यासाठी म्हाडाकडे पत्रव्यवहार करावा लागणार आहे.