
आयआयटी मुंबईत टेकफेस्टची धूम
मुंबई, ता. १५ : तंत्रज्ञान आणि त्यांच्या नवीन आविष्काराचा महोत्सव म्हणून जगभरात ओळख असलेल्या आयआयटी टेकफेस्टची धूम शुक्रवार (ता. १६) पासून सुरू होत आहे. १८ डिसेंबरपर्यंत हा फेस्टिवल चालणार आहे.
टेकफेस्टच्या निमित्ताने जीओच्या माध्यमातून ५-जीची सेवा आयआयटी परिसरात लाँच केली जाणार आहे. त्यामुळे देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये आयआयटी मुंबई ही पहिली संस्था ५-जी फाईडने व्यापली जाणार आहे. टेकफेस्टची यंदाची २६ वी आवृत्ती असून यात पहिल्यांदाच ड्रोन लाईट शो मुंबईकरांना जवळून अनुभवायला मिळणार आहे. त्यासोबतच विविध देशांतील विद्यापीठे, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ड्रोनच्या शर्यती लक्ष वेधणार आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या अंधारातील ड्रोनच्या शर्यतीसाठी अनेक देशांतील स्पर्धक सामील होतील; तर यामध्ये विजेत्या स्पर्धकांना पहिल्याच दिवशी १ लाखांचे पारितोषिकही दिले जाणार आहे.
...
सर्वांत उंच मानवीय रोबोट
तीन दिवस चालणाऱ्या टेकफेस्टमध्ये विविध तंत्रज्ञानाच्या आविष्कारांचे प्रदर्शन लावण्यात येणार असून त्यात जगभरातील विद्यार्थी, तंत्रज्ञानविषयक कंपन्या सहभागी होणार आहेत. रोबोटच्या प्रदर्शनात या वेळी पहिल्यांदाच जगातील पहिला बुद्धिमत्ता बायोनिक क्वाड्रप्ड हा युनिट्री-जीओ-१ हा रोबोट आणि त्याच्या करामती जवळून पाहता येतील. फॉरम्युला ई एम- ८, ईलेक्ट्रो जेनरेशन-२, रॅपटॉर ईटीएच झुरीच आदी रोबोटचे आविष्कार पाहता येतील. यासोबत इंड्रो हा इस्रो-भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा आणि भारतात बनवलेला सर्वांत उंच मानवीय रोबोटही येथे असणार आहे.
...
नामवंतांची व्याख्याने
लेक्चर सीरिजमध्ये फिनलँडच्या अकराव्या अध्यक्षा टारजा हालोनेन, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, गुगल मॅपचे को फाऊंडर कॅथरीन लुएडर्स, नासाचे सहयोगी प्रशासक, एचईओ, डॉ. जी. सतीश रेड्डी आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. रात्रीला विविध प्रकारच्या संगीमय आणि लेझर शोने विविध छटा उमटवणारे कार्यक्रमही टेकफेस्टमध्ये होणार आहेत.