कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकडीला आता मंत्रालयातून मान्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकडीला आता मंत्रालयातून मान्यता
कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकडीला आता मंत्रालयातून मान्यता

कनिष्ठ महाविद्यालयांच्या तुकडीला आता मंत्रालयातून मान्यता

sakal_logo
By

मुंबई, ता. १६ : राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित आणि इतर खासगी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये देण्यात येणाऱ्या अतिरिक्त तुकड्यांना आता मंत्रालयातूनच मान्यता दिली जाणार आहे. यापूर्वी राज्यातील शिक्षण उपसंचालकांचे तुकडीसंदर्भातील अधिकार काढून घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे अकरावीच्या अतिरिक्त अथवा नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांच्या मंजुरीसाठी शिक्षण संस्थांना मंत्रालयात येऊन फेऱ्या माराव्या लागणार आहेत. याविषयी संस्थाचालकांसोबतच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्येही नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाने जीआर जारी केला असून त्यात अनुदानित, अंशत: अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना इयत्ता १२ वीची तुकडी मंजूर करण्याची बाब आता शासकीय स्तरावर होणार आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, २०१२ अन्वये मान्यता देण्यात आलेली कनिष्ठ महाविद्यालये वगळून इतर कनिष्ठ महाविद्यालयांना तुकडीवाढ मंजूर करण्याचे अधिकार केवळ राज्य सरकारला राहणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे.