
रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसी
मुंबई, ता. १६ ः रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. च्या रिलायन्स हेल्थ इन्फिनिटी पॉलिसीमध्ये पाच कोटींचे उच्च विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच क्रेडिट स्कोअर आणि बीएमआय इंडेक्स चांगला असणाऱ्यांना आणि महिलांना विशेष सवलती मिळतील, अशी माहिती रिलायन्स जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश जैन यांनी दिली.
आर्थिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असलेल्या विमाधारकांना या पॉलिसीत सवलत लाभ मिळतील, हे याचे वैशिष्ट्य आहे. त्यांना त्यांच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित सवलत मिळेल, तर त्यांच्या बीएमआय इंडेक्सवर आधारित प्रीमियमवर सवलत मिळेल. यात जगप्रवास करणाऱ्यांसाठी मोरग्लोबल कव्हर, एअर ॲम्ब्युलन्स व ओपीडी सुविधांसह परदेशात आपत्कालीन व नियोजित वैद्यकीय उपचारांसाठी विमाछत्र मिळेल, असेही जैन म्हणाले. ही पॉलिसी वैयक्तिक आणि फॅमिली फ्लोटर (आठ सदस्यांपर्यंत) श्रेणीत उपलब्ध आहे. ९० दिवसांहून मोठी मुले आणि १८ ते ६५ वर्षे वयोगटातील मोठी व्यक्ती यांचा या पॉलिसीमध्ये समावेश होईल. फॅमिली फ्लोटर पॉलिसीमध्ये मुलीचा विमा उतरवण्यासाठी पाच टक्के सूट आणि प्रस्तावक महिला असल्यास आणखी पाच टक्के सूट मिळेल. त्याशिवाय ऑनलाईन पॉलिसी खरेदी करून दहा टक्के सूट मिळेल. पॉलिसी घेण्यासाठी कंपनीची www.reliancegeneral.co.in ही वेबसाईट आहे.