महारेराकडून घर विक्रीकरार बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महारेराकडून घर विक्रीकरार बंधनकारक
महारेराकडून घर विक्रीकरार बंधनकारक

महारेराकडून घर विक्रीकरार बंधनकारक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : घर खरेदीदारांचे हित जपण्यासाठी ‘महारेरा’ने खरेदीदार आणि विकसक यांच्यातील विक्रीकरार प्रमाणीकृत मसुद्यानुसार करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार विकसकांकडून अनिवार्य कलमांचे उल्लंघन झाल्यास नोंदणीकृत प्रकल्पांच्या नोंदणीचे अर्ज सरसकट नाकारण्यात येतील, असा इशाराही महारेराने दिला आहे.

महारेराकडे घर खरेदीदारांच्या तक्रारी येतात. यामध्ये विहित मसुद्यातील कलमांऐवजी वेगळ्या स्वरूपाची कलमे समाविष्ट केल्याचे आढळून आले आहे. याची नोंद घेत महारेराने घर खरेदीदाराचे हित जपण्यासाठी काही बाबी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये महारेरा विक्री करारांमध्ये दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार या विक्री करारातील ४ महत्त्वपूर्ण तरतुदींबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, असे महारेराने स्पष्ट केले आहे. इतर बाबतीत खरेदीदारांच्या सहमतीने बदल केले जाऊ शकतात; परंतु खरेदीदाराला ते बदल ठळकपणे कळण्यासाठी ते अधोरेखित करणे आवश्यक असल्याचे महारेराने परिपत्रकात म्हटले आहे.

महारेराच्या निर्णयातील मुद्दे
- विकसक-घर खरेदीदार यांच्यातील विक्रीकरार रेरा कायद्यातील तरतुदींशी सुसंगत असावा.
- विकसकांना नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्रे महारेराच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक.
- विकसकास तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे कराराच्या विहित मसुद्यामध्ये बदल करण्याची परवानगी.
- विकसकांनी विक्रीसाठीच्या विहित करारात बदल केला असल्यास तो अधोरेखित करणे आवश्यक.
- रेरा कायद्यातील तरतुदीनुसार नैसर्गिक आपत्ती, चटई क्षेत्राचा उल्लेख आवश्यक.