एलअँडटीचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधील भागभांडवल विकण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एलअँडटीचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधील भागभांडवल विकण्याचा निर्णय
एलअँडटीचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधील भागभांडवल विकण्याचा निर्णय

एलअँडटीचा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधील भागभांडवल विकण्याचा निर्णय

sakal_logo
By

मुंबई, ता. १९ : एलअँडटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स लिमिटेडमधील संपूर्ण म्हणजे ५१ टक्के भागभांडवल एलअँडटीने एडेलवाईज ऑल्टरनेटिवव्हद्वारे व्यवस्थापित इन्फ्रास्ट्रक्चर फंड यील्ड प्लस दोन या पोर्टफोलिओ कंपनीला विकण्याचा करार केला.

नॉन कोअर अॅसेट हेवी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स पोर्टफोलिओमधील त्यांचा सहभाग कमी करण्याच्या धोरणानुसार एलअँडटीने हा निर्णय घेतला आहे. एलअँडटी आयडीपीएल हा लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड यांचा संयुक्त उपक्रम आहे. ज्यामध्ये एलअँडटीचा ५१ टक्के आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्वेस्टमेंट बोर्डचा ४९ टक्के वाटा आहे. एलअँडटी आयडीपीएलने रस्ते, पूल, बंदरे आणि शहरी पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प विकसित केले आहे.

एडेलवाईस ऑल्टरनेटिव्हसचे पायाभूत सुविधा धोरण हे ऊर्जा वितरण, पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा आणि महामार्ग अशा महत्त्वाच्या क्षेत्रांच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याचे आहे. या संपादनानंतर ते भारतातील एक प्रमुख पायाभूत गुंतवणूकदार बनतील. व्यवहाराच्या विक्रीतून मिळालेले अंदाजे २,७२३ कोटी रुपये उत्पन्न एलअँडटी आयडीपीएल आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्वेस्टमेंट बोर्ड यांना मिळेल, अशी माहिती कंपनीचे पूर्णवेळ संचालक डी. के. सेन यांनी दिली.